संजय गांधी निराधार अनुदान योजना - आवश्यक जोडपत्रे

1) विहीत नमुन्यातील अर्ज रु. 10/- चे कोर्ट फी स्टॅम्प सह.

 

2) वयाचा दाखला - ग्रामपंचायतीच्या जन्म नोंद वहीतील उता-याची साक्षांकीत प्रत. शाळा सोडल्याचा दाखाला, शिधापत्रिकेत नमुद केलेल्या वयाच्या उता-याची साक्षांकीत प्रत, निवडणुक मतदार यादीत नोंदलेल्या वयाबाबतचा उतारा, ग्रामीण / नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक किंवा वरील दर्जाच्या शासकिय वैद्यकीय अधिका-याने दिलेल्या वयाचा दाखला.

 

3) असमर्थतेचा / रोगाचा दाखला : जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन), वैद्यकीय अधिक्षक, शासकिय वैद्यकीय महाविद्यालये किंवा त्या महाविद्यालयाच्या संबधित विभाग प्रमुखाना दिलेला दाखवला (संजय गांधी इंदिरा गांधी मधील अन्य नमुना () करीता )

 

4) उत्पन्नाचा / मिळकतीचा दाखला : मंडळ निरीक्षक,नायब तहसिलदार, तहसिलदार यांनी ग्रामसेवक तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेल्या उत्रन्नाचा दाखला. अथवा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव अल्याबाबत साक्षांकित उतारा.

 

5) कोणत्याही सरकारी किंवा बिनसरकारी किंवा धर्मदाय संस्थेचा किंवा निवासगृहाचा अंतर्वासी नसल्याचा दाखला मंडळ निरीक्षक, नायब तहसिलदार. तहसिलदार यांनी ग्रामससेवक तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेल्या दाखला.

 

6) रहिवाशी असल्याचा दाखला : ग्रामसेवक, तलाठी, मंडल निरीक्षक, नायब तहसिलदार किंवा तहसिलदार यांनी दिलेल्या रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.